साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य राष्ट्रीय संचित
व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर सुनिलकुमार लवटे यांचे प्रतिपादन
सातारा
श्यामची आई यासारख्या अनेक पुस्तकांमुळे साने गुरुजींची ओळख झाली असली तरी साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य तेवढेच महत्त्वाचे आहे आणि हे अप्रकाशित साहित्य हे एक राष्ट्रीय संचित असल्याचे प्रतिपादन साने गुरुजींच्या साहित्याचे अभ्यासक नई संशोधक डॉक्टर सुनिलकुमार लवटे यांनी केले
येथील सातारा नगर वाचनालय,पुस्तकप्रेमी ग्रुप आणि दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने डॉक्टर सुनिलकुमार लवटे यांची त्रिदिवशीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे त्याचे पहिले पुष्प गुंफताना डॉक्टर लवटे यांनी साने गुरुजींच्या अप्रकाशित साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉक्टर अशोक भोईटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ उपस्थित होते
यावेळी व्यासपीठावर राजेंद्र माने डॉक्टर संदीप श्रोत्री विनोद कुलकर्णी शिरीष चिटणीस आणि श्रीराम नानल उपस्थित होते
डॉक्टर लवटे पुढे म्हणाले,साने गुरुजी यांची आत्तापर्यंत 80 पुस्तके प्रकाशित झाली आहेत पण अजून किमान 55 पुस्तके अप्रकाशित आहेत 2025 मध्ये साने गुरुजींची 125 वी जयंती येत आहे त्यानिमित्ताने का होईना साने गुरुजी यांचे हे अप्रकाशित साहित्य वाचकांसमोर येणे गरजेचे आहे एक राष्ट्रीय संचित म्हणून या साहित्याकडे बघायला हवे सुनील कुमार लवटे यांनी यावेळी साने गुरुजी यांच्या पत्रकार या भूमिकेवरही प्रकाश टाकला अमळनेर येथे साने गुरुजी यांनी तब्बल दोन वर्षे छात्रालय नावाचे हस्तलिखित दैनिक सुरू केले होते या पाच पानी दैनिकाचा सर्व मजकूर ते रोज हाताने लिहीत असत नंतरच्या कालावधीमध्येही त्यांनी प्रदीप आणि साधना अशासारख्या नियतकालिकांच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेचे पैलू दाखवून दिले

डॉक्टर राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजी यांच्या अप्रकाशित साहित्याचा शोध घेतला आता हे अप्रकाशित साहित्य वाचकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारसह विविध संस्थांनी घेण्याची गरजही यावेळी सुनिललकुमार लवटे यांनी व्यक्त केली
या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुनिलकुमार लवटे यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांचा शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन डॉक्टर अशोक भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
शिरीष चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक भोईटे यांनी सुनिलकुमार लवटे यांच्या काही आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किशोर बेडकीहाळ यांनी साने गुरुजी केवळ लेखक किंवा समाजसेवक नव्हते तर एक विचारवंत होते असे स्पष्ट करून साने गुरुजींच्या साहित्याला रडके साहित्य किंवा मातृ हृदयी साहित्य म्हणून त्याची हेटाळणी करणाऱ्यांनी या साहित्याचे मोठेपण समजून घ्यायला हवे असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीप श्रोत्री यांनी केले यावेळी त्यांनी पुस्तकप्रेमी ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला
आभार प्रदर्शन श्रीराम नानल यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले
यावेळी कोल्हापूरच्या पुस्तकप्रेमी ग्रुपचे कृष्णा दिवटे आणि सुहास कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते

