दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे टाटा नेक्साॅन ईव्ही गाडीचे वितरण


सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित साताराच्या सभासद साधना शुभम जाधव यांना मुख्य शाखेचे शाखाधिकारी लक्ष्मण कदम यांच्या हस्ते टाटा
नेक्साॅन ई. व्ही. गाडीचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस, व्हा.चेअरमन आप्पा शालगर, व्यवस्थापक विनायक भोसले, शुभम जाधव ,भगवान नारकर,अनिल चिटणीस,लालासो बागवान, आग्नेश शिंदे, जनार्दन निपाणे,रविराज जाधव,शुभम बल्लाळ सदर प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी शिरीष चिटणीस म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्थेने सातारा शहरातील सहकारी चळवळीला एक व्यापक आधार दिला असून वाहन कर्ज वितरण योजने अंतर्गत सभासदांची व्यक्तिगत तसेच व्यावसायिक गरज लक्षात घेऊन या सणासुदींच्या दिवसांमध्ये व्यक्तिगत वापरास तसेच व्यवसायास पूरक ठरणाऱ्या वाहनांस संस्था कर्जरूपी आर्थिक पुरवठा करून एक प्रकारे व्यवसायस चालना देण्याचे काम अविरत करत आहेत.. अशा या संस्थेने आज पर्यंत अनेक व्यवसायास पुरक ठरणाऱ्या वाहनांसाठी आर्थिक पतपुरवठा करून सभासदांची आर्थिक पत वाढवली आहे.

Advertisement

दीपलक्ष्मी पतसंस्था गेली 28 वर्ष ग्राहकाभिमुख धोरण राबवित असून कर्जाच्या विविध योजना तसेच घरगुती तसेच व्यावसायिक उपयोगासाठी वाहनांना कर्जरूपी आर्थिक पतपुरवठा करीत आहे .याचा समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांनी रोजगारासाठी तसेच व्यक्तिगत वापरासाठी कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा.
असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!