काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांचीच माघार


कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाट्यपूर्ण घडामोड

Advertisement

कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे आज माघार घेतली. ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी नगरसेवक राजेश लाटकर हे माघार घेतील असे ठामपणे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत होते; पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनीच आज अडीचच्या सुमारास निवडणूक कार्यालयात जात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला .त्यामुळे महाविकास आघाडीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आता पक्षाचे हात हे चिन्ह असणारा नाही. अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले राजेश लाटकर यांना आता पुरस्कृत करण्याची वेळ काँग्रेसवर येणार आहे. आधी पहिल्या टप्प्यात जाहीर केलेला काँग्रेसचा अधिकृत उमेदवार राजेश लाटकर यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की काँग्रेस पक्षावर आली होती. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांत लाटकर यांची उमेदवारीवरून प्रचंड असंतोष असल्याचे कारण सांगण्यात आले त्यातून ऐनवेळी त्यांच्या ऐवजी सौ. मधुरिमाराजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली; पण त्यांनीच आज माघार घेतल्यामुळे या राष्ट्रीय पक्षाचे पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. सौ.मधुरिमाराजे यांच्या माघारी मागे गेल्या 24 तासात अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!