ऑगस्ट क्रांती संविधान संरक्षणाच्या अथक प्रयत्नाचे अभिवचन – शिवाजी राऊत
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे कार्यक्रम
सातारा
ऑगस्ट क्रांती ही केवळ देशाच्या स्वातंत्र्य इतिहासाची आठवण नव्हे, तर संविधान संरक्षणाच्या अथक प्रयत्नाचे अभिवचन आहे. १९४२ ची क्रांती ही सामाजिक न्याय प्रस्थापन करणे, संघर्षाचा अधिकार, संघटनाचा अधिकार, विचाराचा अधिकार, तसेच हाताला काम मिळवण्याचा अधिकार व शिक्षणाचा अधिकार संघर्षातून मिळवण्याचा निरंतर प्रयत्न करण्याचा संकल्प दिवस होय. हुतात्म्ये व स्वातंत्र्यवीरांचे कृतज्ञ स्मरण करण्याचा हा दिवस आहे. हेच ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व युवकांनी निरंतर अंत:करणात जपून वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी स्मारक समितीचे कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले.
शिवाजी राऊत हे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्य येथील क्रांती दिनानिमित्त व्याख्यानात बोलत होते. या प्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी.एस सावंत होते.
शांतीचे पुजारी महात्मा गांधी व बहुजनांच्या शिक्षणाचे भगीरथ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनानंतर झालेल्या व्याख्यानात राऊत म्हणाले की भारत हा इतिहास काळापासून अनेक टोळ्या व राजेशाहीला बळी पडलेला हा आध्यात्मिक गूढवादी देश आहे. इथे ज्ञान शोध नवनिर्माण यांचा इतिहास नाही. त्यामुळे बौद्धोत्तर व जैनोत्तर व वारकरी संप्रदायोत्तर मुघल कालखंडानंतर भारतावर ब्रिटिशांचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते. 9 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या ग्वालियर टॅंकवर महात्मा गांधींनी ‘चलेजाव” ची ब्रिटिशांना दिलेली ती हाक आणि सातारा जिल्ह्याने ऐकली त्यातून १९४२ च्या लढ्यासाठी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे हजारो स्वातंत्र्य सेनानी नाना पाटील, जी डी बापू, किसनवीर पांडू तात्या बोराटे , कचरे मास्तर, गणपतराव बटाणे, कासेगावकर वैद्य, दादासाहेब उंडाळकर, दिवंगत यशवंतराव चव्हाण, विठ्ठल राव सोमन, आचरेकर, भट्टड काकू, डॉक्टर हकीम शेख काका, अनेक जण तसेच नाथ घाणेकर, सोपानराव घोरपडे, लक्ष्मण शास्त्री जोशी हेही आहेत.
ज्ञानाचे व्यवस्थापन करणारे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च च्या विद्यार्थ्यांनी नवनिर्मीती व समाज ऐक्याच्या चळवळी पुढे चालवल्या पाहिजेत. संविधानाच्या घोषणेतले स्वातंत्र्य वर्तमाना त निर्माण करण्याची युवकांची विद्यार्थ्यांची ज्ञान क्षेत्रातल्या व्यवस्थापकांची जबाबदारी आहे आजच्या युवकांनी लोकप्रतिनिधींना नियंत्रित करून सत्ता संचालनासाठी झेनजी चळवळी देशभर आता निर्माण केल्याशिवाय धोक्यात आलेले स्वातंत्र्य रक्षण असंभव आहे असे सांगून राऊत यांनी 42 च्या लढ्यातील नायकांच्याबद्दल महात्मा गांधींना कोटी कोटी प्रणाम, शहीद भगतसिंगांना कोटी कोटी प्रणाम, क्रांतीसिंह नाना पाटलांना यांच्यासह हुतात्मा परशुरामांना कोटी कोटी प्रणाम अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून वदवून घेतल्या
कार्यक्रमाप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (कूपर कॉलनी, सातारा) केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी कांचन बेहेनजी आणि त्यांच्या सहकारी ब्रह्माकुमारी दीप्ती बेहेनजी यांची विशेष उपस्थिती लाभली.याप्रसंगी ब्रह्माकुमारी कांचन बेहेनजी यांच्या हस्ते ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘राजयोग जीवनशैली’ याविषयावर मार्गदर्शन करणाऱ्या पत्रकांचे अनावरण करण्यात आले. व्यसनमुक्तीसाठी आणि मानसिक शांततेसाठी राजयोगाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. नशा मुक्तीसाठी सर्वांना शपथ दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी एस सावंतम्हणाले की आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि व्यवस्था यांचा अनुबंध जोडण्याचे भान विद्यार्थीदशे पासून बाळगले पाहिजे ऑगस्ट क्रांती दिन स्वातंत्र्य चळवळ हा इतिहासच वर्तमानाचा विचार बळकट करतो. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व हुतात्म्यांचे नित्य वाचन व स्मरण करण्याची गरज आहे.
सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कु. साई आडेकर हिने कर्मवीर स्तवन सादर केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. आर. डी. कुंभार यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय कु. पी. व्ही. जाधव यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रक्षिता बाफना हिने केले, तर प्रा. एस. बी. भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

