चंद्रशेखर टिळक यांचे “काश्मीर असेही “या विषयावर रविवारी व्याख्यान


आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी पतसंस्था यांचा उपक्रम

Advertisement

सातारा
आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रसिद्ध लेखक व वक्ते चंद्रशेखर टिळक यांचे “काश्मीर असेही ” या विषयावर व्याख्यान कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, 759 अ शनिवार पेठ सातारा येथे रविवार दि. 07 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषद कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, दै.प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची सन्माननीय उपस्थिती तसेच शिरीष चिटणीस, डॉ.संदीप श्रोत्री, श्रीराम नानल मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.सिमंतिनी नुलकर करणार आहेत.
चंद्रशेखर टिळक यांचे “काश्मीर असेही ” या व्याख्यान कार्यक्रमासाठी समस्त सातारकरांनी यावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!