साताऱ्यात शनिवारी सुमनांजली गाण्यांचा कार्यक्रम
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपुर यांना आदरांजली
सातारा
येथील माय बिट्स सिंगिंग स्टुडिओच्या विद्यमाने ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपुर यांनी गायलेल्या हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम सुमनांजली शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता महिला मंडळ हॉल राजवाडा सातारा येथे सादर केला जाणार आहे. हा वाद्यवृंद कार्यक्रम असून तबला, पेटी व इतर वाद्यांचा वापर करून गाणी सादर केली जाणार आहेत, यावेळी हार्मोनियमवर वैभव साने, तबल्यावर नितीन पंडित आणि साईड रिदम अर्चित साने सांभाळणार आहेत. लाईव्ह कार्यक्रमामध्ये वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, सीमा रजपुत, चित्रा भिसे, श्रुती शहा, सारिका हेंद्रे, गणेश शिंदे आणि डॉक्टर लियाकत शेख गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय दीक्षित,शिरीष चिटणीस, मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन डॉक्टर लियाकत शेख यांचे असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे सांभाळणार आहेत. निवेदन चित्रा भिसे करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माय बिट्स सिंगिंग स्टुडिओतर्फे करण्यात येत आहे

