कलेला आधुनिक तंत्राची जोड द्या : शिरीष चिटणीस
सातारा
लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी या विद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा केला गेला. याप्रसंगी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेची संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते् त्यांनी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो असे प्रतिपादन केले .तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांनी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये तीन वेळा मिळवलेले सुवर्णपदक या त्यांच्या कामगिरी वषयी माहिती सांगितली कलेला आधुनिक तंत्राची जोड द्या असे आवाहन त्यांनी केले
या दिनाचे औचित्य साधून , गणेश उत्सव यानिमित्त विद्यालयांमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेली होती. खो-खो या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे विद्यालयाची माजी विद्यार्थी तेजस सावंत व त्याची पत्नी सौ. कोमल सावंत उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना भावी करिअर विषयी अनमोल मार्गदर्शन केले. कलेला अतिशय महत्त्व आहे असे प्रतिपादन केले. कलेमुळे माणसाचे जीवन समृद्ध होते तसेच विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी हे कायम ठेवली पाहिजे. आपण कोणतेही काम प्रामाणिकपणे व निष्ठा पूर्वक केले तर आपण यशस्वी होते असे मत मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शशिकांत जाधव सर यांनी केले व आभार शशिकांत जमदाडे सर यांनी मानले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सावंत सर, राहुल घोडके ,रमेश महामुलकर, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.

