क्रांतीसिंहांना जयंती निमित्ताने साताऱ्यात अभिवादन
प्रतिसरकारच्या धर्तीवर चळवळ आवश्यक – कॉ माणिक अवघडे
सातारा
जात्यांध धर्मांध शक्ती विरोधात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ज्या पद्धतीने प्रतिसरकारची चळवळ केली त्याच पद्धतीची चळवळ युवकांच्या नेतृत्वाखाली सुरू केली पाहिजे असे विचार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सातारा जिल्हा समिती चे प्रमुख कार्यकर्ते कॉम्रेड माणिक अवघडे यांनी व्यक्त केले.
सातारच्या राजवाड्याजवळ असलेल्या सर्व श्रमिक संघाच्या व सातारा म्युनिसिपल कामगार युनियन (लाल बावटा) यांच्या कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कॉ माणिक अवघडे बोलत होते.
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्रचे प्रवक्ते कॉ विजय मांडके यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कॉ. शंकर पाटील , कॉ. प्रमोद परामणे ,कॉ विजय निकम , सुहास पुजारी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉ. माणिक अवघडे देशापुढील परिस्थिती कशी बिघडत चालली आहे याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना कॉ विजय मांडके यांनी क्रांतिसिंह नाना पाटील ज्या पद्धतीने लोक भाषेत बोलून प्रश्न समजावून सांगत होते. असेच सध्या लोकभाषेत बोलून श्रमिक , महिला , युवक कष्टकरी , दलित , शेतकरी , शेतमजूर ,कामगार यांना तसेच सर्व जाती धर्मातील लोकांना संघटित केले पाहिजे आणि जात्यांध व धर्मांधतेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे असे आवाहन केले.
सुहास पुजारी यांनी सांगली जिल्हा व नाना पाटील यांचा संबंध विषद केला. तर प्रकाश खटावकर व एडवोकेट विलास वाहगावकर यांनी सर्व समविचारी संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्र करून एकदिलाने प्रतिगाम्यां विरोधात संघर्ष केला पाहिजे असे सांगितले. कॉ विजय निकम यांनी सातारच्या चलेजाव चळवळीच्या स्मारकाच्या अनुषंगाने माहिती दिली व हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
कॉ प्रमोद परमणे यांनी आभार मानले.
यावेळी अनिल वीर , शिवाजी माने ,आप्पा खंडझोडे , रेखाताई खंडझोडे , सुर्यकांत घोरपडे, जुबेर मुजावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

