साताऱ्यात चित्रप्रदर्शनाचे आज उदघाटन
दीपलक्ष्मी सभागृहात ३१ मार्चपर्यंत पाहण्याची संधी
सातारा
दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या सहकार्याने दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह कन्याशाळे पाठीमागे सातारा शहर येथे दिनांक 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार वाजताएक अनोखे चित्र प्रदर्शन आयोजीत केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून बारामती स्थित कलासंस्कार स्टुडिओ येथील कलेतील / डिझाईन क्षेत्रातील प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन भरवण्याची अनोखी संकल्पना या स्टुडिओचे डायरेक्टर सचिन कदम सर यांनी या चित्रपटदर्शनाद्वारे मांडली आहे ,या चित्रपटदर्शनाचे उद्घाटन दिनांक 28 मार्च रोजी दुपारी चार वाजता प्राध्यापक राजेंद्र निकम सर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ शिल्पा चिटणीस ,प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र शेजवळ ,नारायण रामचंद्र पवार तसेच प्राचार्य विजयकुमार धुमाळ हे उपस्थित राहणार आहेत
यावेळी या कला संस्कार स्टुडिओ बारामतीतील प्रवेशित प्रथम वर्ष इ.11 वी व द्वीतीय वर्ष इ.12 वी या दोन वर्षातील विद्यार्थ्यांनी घडवलेल्या विविध चित्रकृतींचे कला विषयांवरील चित्र प्रदर्शन दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे दि. 29 मार्च ते 31 मार्च अखेर सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे
बारामती येथे हा कला संस्कार स्टुडिओ सुरू होऊन आज रोजी सहा वर्षे पूर्ण झाली आहेत स्टुडीओचे डायरेक्टर – चित्रकार सचिन दादासाहेब कदम हे जातीने लक्ष घालून या विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने डिझाईन करिअरशी सलग्न कलेतील विविध उच्च पदवी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांची नियोजन पूर्व योग्य ती तयारी बारामती येथे प्रत्यक्ष करून घेत आहेत या दृष्टीने सातारा मधील या करिअरसाठी इच्छुक विद्यार्थी, जिज्ञासू पालक यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून सदर करिअरची संधी तसेच या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या कामाची तयारी असा दुहेरी हेतू या प्रदर्शनाच्या माध्यमातून साध्य होत आहे तसेच या क्षेत्राशी संबंधित शैक्षणिक संधीसाठी इच्छुक विविध शाखांमधे आकरावी व. बारावी मध्ये प्रवेशित विद्यार्थी तसेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या कला प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कला संस्कार स्टुडिओ बारामतीचे सचिन दादासाहेब कदम यांच्यामार्फत करण्यात आले आहे

