यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गाठले यशाचे नवे शिखर


सातारा :
यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा अधिक बळकट केली आहे.
प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या निकालात धनश्री कुर्ले हिने ८.७२एस.जी.पी.ए. मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषया शिवणकर हिने ८.६६एस.जी.पी.ए. मिळवत द्वितीय क्रमांक, तर ऐश्वर्या काळे हिने ८.४५ एस.जी.पी.ए. मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

Advertisement

 


विद्यार्थ्यांच्या यशात सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासातील सातत्य, नियोजनबद्ध तयारी आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळ देण्यासाठी महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, आधुनिक संगणक सुविधा आणि तज्ञ प्राध्यापकवर्ग उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्कृष्ट व पोषक शैक्षणिक वातावरण मिळत आहे..
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे आणि प्राचार्य डॉ. व्ही. जे. चवरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!