भारतीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
११ ऑगस्टपर्यंत अनेक चित्रपट पाहता येणार
सातारा
यावर्षी साजरा होणा-या ८० व्या ‘स्वातंत्र्य दिनानिमित्त पत्रकार, समिक्षकांच्या शतक महोत्सवी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतीय शाखेद्वारे निवडलेल्या, तसेच फेडरेशन आॕफ फिल्म सोसायटी आॕफ इंडियाच्या पश्चिम विभाग आणि गत २८ वर्षे चित्रपट रसिकांच्या चित्रपट विषयक जाणिवा समृद्ध करणारी, अभ्यासपूर्ण माध्यमाद्वारे सामाजिक प्रबोधन करणा -या साता-यातील एकमेव सांस्कृतिक, कलात्मक संस्था ‘अनुभव फिल्म क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित , फिप्रेस्की- भारतीय चित्रपट महोत्सवचे उद्घाटन दीपलक्ष्मी सभागृहात दीप प्रज्वलित करुन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव आणि फेडरेशन आॕफ फिल्म सोसायटी आॕफ इंडियाचे सदस्य राजभूषण सहस्रबुद्धे यांनी या महोत्सवाचे उद्दीष्ट आणि चित्रपट माध्यमाचे महत्व विशद केले. कोणत्याही समाजजीवनाची बारकाईने ओळख करुन घ्यायची असेल तर पर्यटनापेक्षा तेथील चित्रपट पाहणे जास्त उपयुक्त आणि परिणामकारक ठरतात. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी या महोत्सवात ३ ते ११ आॕगस्ट दरम्यान आसामी, मराठी, बंगाली, मगही, राजस्थानी, कोर्बी, मल्याळी भाषेतील १० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. असे महोत्सव संस्था नेहमीच आयोजित करते. त्याचा रसिकांनी ‘अनुभव’ घ्यावा असे आवाहन केले. तर डॉ. सारीका देशपांडे यांनी अनुभव फिल्म क्लब मुळे वैविध्यपूर्ण उत्तमोत्तम कलाकृती पहाता येतातच, याशिवाय त्यानंतर होणा-या रसग्रहणात्मक चर्चेनंतर रसिक मानवी जीवनामृताने अधिक समृद्ध होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.
यासोबत आसामच्या पूररप्रवण क्षेत्रातील मिसींग या जमातीच्या जनजीवनातील हलाखी, बालविवाह प्रथा, अंधश्रद्धा यांवर प्रकाश टाकणारा ‘याशिकाज् डॉटर’ हा सुंदर चित्रपट दाखवण्यात आला. आणि त्यावर सखोल चर्चादेखील करण्यात आली. यात खजिनदार मकरंद जोशी, शुभम बल्लाळ,जगदीश खंडगळे,मोहना आपटे, सायली कोल्हटकर, मंजिरी जोशी, गीता पाटील, स्वाती राऊत यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या महोत्सवात भारतीय जीवनाच्या वैविध्यतेचा अनुभव देणा-या नुकत्याच प्रदर्शित १ राजस्थानी, १ आसामी, १ कार्बी, १ मगही, १ मराठी, २ बंगाली आणि ३ मल्याळी भाषेतील वैविध्यपूर्ण भारतीय सांस्कृतिक जीवनाची ओळख करुन देणा-या १० उत्तम कलात्मक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
तरी सातारकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन उत्तम कलाकृतींचा आस्वाद घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क. राजभूषण सहस्रबुद्धे ९८२२२०६०२६

