समाजहिताचे काम करण्यासाठी ब्राह्मण महासंघ


विवेकशास्त्री गोडबोले यांचे प्रतिपादन
सातारा
२००७ साली स्थापन करण्यात आलेला अखिल ब्राह्मण महासंघ हा केवळ ब्राह्मण समाजासाठी काम करत नाही तर समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन महासंघाचे संस्थापक आणि मार्गदर्शक वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी केले
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे रविवार २७ ऑक्टोबर रोजी चारुदत्त आफळे यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित सागरा प्राण तळमळला हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त विवेकशास्त्री गोडबोले यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली
महासंघाची स्थापना झाल्यानंतर काहीच दिवसांनी परळी खोऱ्यातील एका गावात आग लागून मोठे नुकसान झाले यावेळी महासंघाने पुढाकार घेऊन ७०००० रुपयांची आर्थिक मदत आगग्रस्त ग्रामस्थांना दिली आगीमुळे नुकसान झालेले एकही कुटुंब ब्राह्मण नसतानाही महासंघाने समाजहिताच्या भूमिकेतून हि मदत केल्याचे विवेकशास्त्री गोडबोले यांनी स्पष्ट केले
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महासंघाने असे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवले आहेत वधू वर मेळावे ,सामुदायिक मौजीबंधन ,गुरुचरित्र पारायण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महासंघाने आपले कार्य विस्तारले आहे असेही विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले
रविवार २७ ऑक्टोबर रोजी होणार चारुदत्त आफळे यांचा कार्यक्रम समाजातील सर्व घटकांना खुला आहे असेही विवेकशास्त्री गोडबोले यांनी अधोरेखित केले

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!