विठ्ठलाचं थेट दर्शन २ जून पासून पुन्हा सुरु
पंढरपूर
Advertisement
मंदिर संवर्धनासाठी १५ मार्चपासून बंद असलेलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं थेट दर्शन आणि पदस्पर्श, २ जून पासून पुन्हा सुरु होणार आहे. मंदिर संवर्धानाचं काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण झालं की २ जूनपासून विठुरायाचं थेट दर्शन घेता येईल, असं मंदिर समितीनं स्पष्टं केलं आहे. संवर्धन कामाच्या काळात दिवसभरात केवळ ५ तास मुखदर्शन सुरु आहे. आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाचं २४ तास दर्शन, ७ जुलै पासून घेता येईल, अशी माहितीही समितीनं दिली आहे.
