मतदान जनजागृती उत्कृष्ट कार्यासाठी यशेंद्र क्षीरसागर यांचा सत्कार


सातारा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान जनजागृतीचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान जनजागृती पथक प्रमुख, कोरेगाव पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मतदार दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे ,अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनजागृती पथकाचे प्रमुख म्हणून श्री. क्षीरसागर यांनी मतदारांमध्ये मतदानाच्या जनजागृतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले. विविध उपक्रम राबविण्यात आले. व्याख्याने, स्पर्धा ,रॅली इत्यादी माध्यमातून सखोल जनजागृती करण्यात आली. मानवी साखळी तसेच प्रत्यक्ष गृहभेटीतून जास्तीत जास्त मतदान जागृती होईल याबाबत त्यांनी सखोल नियोजन केले. जागृतीपर गीत लेखन तसेच व्हिडिओ निर्मिती करून सोशल मीडियातून प्रसार केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या निवडणूक विषयक विचारांचे त्यांनी संशोधन केले आणि त्यावर आधारित लेख लिहून त्यांचा प्रसार केला. शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच कर्मचाऱ्यांमध्ये विविध स्पर्धा घेतल्या. सर्व नागरिकांसाठी निबंध ,कविता लेखन इत्यादी स्पर्धा आयोजित करून त्यांचे यथायोग्य बक्षीस वितरण देखील केले. संत तुकाराम महाराजांच्या वेशामध्ये त्यांच्या अभंगांच्या आधारे हजारो विद्यार्थ्यांसमोर केलेल्या जनजागृती चे विशेष कौतुक झाले.विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटना, लोकशाही आणि निवडणुका याविषयी जागृती करण्यात आली. या सर्वांचा परिपाक म्हणून मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली. निवडणुकीनंतर ” मतदार धन्यवाद रॅलीचा “प्रथमच नाविन्यपूर्ण उपक्रम देखील त्यांनी आयोजित केला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराच्या साक्षीने प्रतिज्ञा घेण्यात आली. ग्रामगीता आणि राज्यघटनेची पालखीतून मिरवणूक काढून लोकशाही दिंडी काढण्यात आली.हे सर्व योगदान लक्षात घेऊन हा सत्कार संपन्न झाला

Advertisement

फोटो ओळ-
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना यशेंद्र क्षीरसागर.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!