बर्मन पितापुत्रांनी संगीतसृष्टी गाजवली


बर्मन बिट्स कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन
सातारा
एस डी बर्मन आणि आर डी बर्मन या पितापुत्रांनी भारतीय संगीतसृष्टी गाजवली आणि या संगीतावर आपला ठसा उमटवला असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि सुहाना सफर ग्रुप, सातारा यांनी संयुक्तपणे बर्मन पिता-पुत्रांनी संगीतबद्ध केलेल्या मधुर हिंदी गाण्यांवर आधारित “बर्मन बीट्स” हा कार्यक्रम सादर केला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .
संगीतकार पितापुत्रांच्या अनेक जोड्या झाल्या पण एकाच काळात दोघेही लोकप्रिय असण्याची घटना मात्र बर्मन यांच्याबाबतच घडली आर डी बर्मन यांचे तिसरी मंझिल सारखे चित्रपट गाजत असताना एस डी बर्मन यांचे आराधना अभिमान यासारखे चित्रपट गाजत होते या दोघांनी भारतीय सांगितलं एक मधुर दिशा दिली असेही मुकुंद फडके म्हणाले
गाण्यांना चांगले संगीत देतानाच चित्रपटातील प्रसंगाना उचित संगीत देउन बर्मन यांनी बँक ग्राउंड मुझिकमध्येही वेफळी वाट निर्माण केली असे ते म्हणाले
यावेळी कार्यक्रमाचे संकल्पक विजय साबळे, शिरीष खुटाळे, चंद्रशेखर बोकील, डॉ. सुनील पटवर्धन, डॉ. सुहास पाटील, राजेंद्र देशमाने, धीरेंद्र राजपुरोहित, वनिता कुंभार, सुषमा, ममता नरहरी सीमा राजपुत, .मंजिरी दीक्षित आणि दीपाली घाटगे यांनी विविध गाणी सादर केली कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्याम बडवे, दिलीप चरेगावकर, शहाबुद्दीन शेख, मुकुंद फडके, विजय साबळे आणि शिरीष चिटणीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कवी प्रा. विश्वास वासेकर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे थोडक्यात नेमक्या शब्दांत सूत्रसंचालन डॉ. सुहास पाटील आणि चंद्रशेखर बोकील यांनी केले . कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन श्री. विजय साबळे यांनी केले होते आणि ध्वनी व्यवस्था श्री. सचिन शेवडे आणि श्रीमती अक्षता शेवडे यांनी केली होती. प्रेक्षकांना हा कार्यक्रम खूप आवडला आणि सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!