सांगलीच्या आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना


महेश खराडेंना उमेदवारी जाहीर,विशाल पाटील याना धक्का

सांगली :
सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुले अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय.कारण विशाल पाटलांनी 2019 ला स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र आता स्वाभिमानीनेच उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस आंदोलन झाले तेव्हा जवळपास 500 किमी पदयात्रा काढली. 20 ते 22 दिवस ही पदयात्रा सुरू होती. तासगाव कारखाना, डोंगराई कारखाना, नागेवाडी कारखाना यांनी थकवलेली ऊसबिले ती शेतकऱ्यांना आंदोलन करून मिळवून दिली होती. बेदाण्यांचा प्रश्न मार्गी लावला. गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष तसेच कणखर नेता म्हणून महेश खराडेंनी चांगल्या पद्धतीने काम केला आहे. शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने ही जागा लढवली होती. जवळपास साडे तीन लाख मते मिळवली होती. यावेळी यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील असा विश्वास आहे.

Advertisement

सांगलीत अपक्ष उभा राहताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील ताकदीची आपल्याला मदत होईल अशी विशाल पाटील यांची अपेक्षा होती. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!