नगर वाचनालयाचा १७३ वा वर्धापन दिन संपन्न


सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय साताराचा १७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ व प्रा डॉ रणधीरसिंह मोहिते उपस्थित होते याच निमित्ताने पद्य विषयक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते झाले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी,
विश्वस्त समिती अध्यक्ष अनंत जोशी ,कार्यवाह वैदेही कुलकर्णी, साहित्यिक डॉ राजेंद्र माने, डॉ श्याम बडवे
डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर,श्रीकांत कात्रे,डॉ संदीप श्रोत्री , पद्माकर पाठकजी,गौतम भोसले, श्रीधर साळुंखे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ शेजवळ म्हणाले,’ सातारचे नगर वाचनालय हे सातारा नगरीचे सांस्कृतिक मस्तक आहे.थोरल्या प्रतापसिंह महाराजांच्या काळापासूनची ग्रंथसंपदा या ग्रंथालयात उपलब्ध आहे.सातारच्या वाचन संस्कृतीमध्ये आणि ती वृद्धिंगत करण्यामध्ये वाचनालयाचे योगदान मोलाचे आहे.
प्रा डॉ रणधीरसिंह मोहिते म्हणाले,या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यात एक वेगळा आनंद मिळाला.या काळात मुलांना वाचनाकडे प्रवृत्त करण्यासाठी वाचनालय महत्त्वाची आहेत.वाचनालयाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ‘
अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी वाचन कट्टा या उपक्रमाच्या निमित्ताने या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले तसेच दोन वर्षांनी वाचनालयाचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून आगामी काळात 175 ठिकाणी वाचन कट्टा उपक्रम करण्याचा मनसुबा जाहीर केला. तसेच वाचनालयातील सर्व कर्मचारी व ग्रंथपाल यांच्या सहकार्याने वाचनालयाची वाटचाल चांगल्या रीतीने होते आहे असे मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना डॉ राजेंद्र माने यांनी ग्रंथालयाचा समृद्ध इतिहास, ग्रंथालयातील प्राचीन ग्रंथसंपदा आणि लोकांनी केलेले संशोधन याविषयी सांगून साहित्यसंशोधन करणाऱ्यांना हे वाचनालय महत्त्वाचे ठरणारे आहे असे प्रतिपादन केले.
पद्माकर पाठकजी यांनी गतसाहित्य संमेलनाध्यक्षांची ९९ छायाचित्रे यावेळी वाचनालयाकडे सुपूर्द केली.
त्यानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला.डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर यांचा नगरवाचनालयातील योगदानासाठी सत्कार करणेत आला.
वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले
डॉक्टर श्याम बडवे यांनी आभार मानले
या कार्यक्रमास ग्रंथपाल रूपा मुळे,विष्णू धावडे,भाग्यश्री शिंदे,,श्री सावंत,श्री विजय दळवी व नगर वाचनाचे सभासद आणि वाचक उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!