साताऱ्यात मंगळवारी स्वराशा कार्यक्रम


आशा भोसले यांच्या हिंदी व मराठी गीतांची सुश्राव्य मैफिल

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 30 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे स्वराशा हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमांमध्ये रसिकांना आशा भोसले यांच्या हिंदी व मराठी गीतांची सुश्राव्य मैफिल ऐकता येणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना विजय साबळे यांची असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली पारसनीस, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस,विजय साबळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायक कलाकार डॉक्टर सुनील पटवर्धन, सचिन शेरकर, चंद्रशेखर बोकील, मिलिंद हर्षे, मंजुषा पोतनीस, ममता नरहरी, स्मिता शेरकर, रेवती बंड, चंद्रकला छंद, दिपाली घाडगे, श्रुती बेंद्रे, सुनीता किर्दत, सुवर्णा लखापती, स्वरांगी शेवडे गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे सांभाळणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!