कुटुंबासारखेच शिक्षक आणि मित्र महत्त्वाचे : म. भा. चव्हाण


साहित्यिक आनंद मेळा – २०२६” कार्यक्रम संपन्न
सातारा :
विद्यार्थ्याला कुटुंबासारखेच शालेय जीवनात शिक्षक शिस्त लावतात त्याचबरोबर मित्रही महत्वाचे आहेत असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक म.भा . चव्हाण यांनी केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा, आदिश जैन फाउंडेशन आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “साहित्यिक आनंद मेळा – २०२६” कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक म .भा चव्हाण बोलत होते.
यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, सचिव शिल्पा चिटणीस, आदिश जैन फाउंडेशनच्या अध्यक्ष मृणाल जैन, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय यादव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण पुढे म्हणाले विद्यार्थ्याला कुटुंब संस्था ही महत्त्वाची असते मात्र जीवनाला आकार शाळेतील शिक्षकच देतात मित्र हे चांगल्या सवयी लावण्याचा साठी मदत करतात . संस्कारांची जपणूक आणि नातेसंबंध दृढ करण्याची गरज याविषयी त्यांनी प्रभावी विचार मांडले. यावेळी नीलिमा फाटक आणि मृणाल जैन यांनीही कुटुंब व्यवस्थेतील विविध पैलूंवर आपले मनोगत व्यक्त केले.
चौथ्या सत्रात “स्वच्छता : वैयक्तिक व सामाजिक” या विषयावर डॉ. मुदुला खेरनार-कुलकर्णी यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांच्याकडून खेळाच्या माध्यमातून उत्तरे जाणून घेतली यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात आली . या सत्राच्या गटप्रमुख म्हणून राजश्री सोले यांनी भूमिका बजावली. तसेच पुष्पा कुलकर्णी, वंदना घाणेकर आणि वंदना ललवाणी यांनी स्वच्छतेचे वैयक्तिक व सामाजिक जीवनातील महत्त्व विषद केले.
कार्यक्रमास उदय जाधव, काकासो निकम, बाळकृष्ण इंगळे, भास्कर जाधव, संगीता कुंभार, देवराम राऊत, प्रतिभा काळे, सतीश पवार, बाळकृष्ण फडतरे, चंद्रकांत देवगड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब पठाण यांनी केले उपस्थिताचे आभार वैशाली वाडीले यांनी मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!