श्री देवगंभीर आश्रमात गुरुचरित्र पारायण सेवा
१०८ पारायणे करण्याचा स्वामी गजानंद महाराज यांचा मानस
सातारा
श्री देवगंभीर आश्रम बरवाडा (तिलकवाडा-गुजरात) यांचे तर्फे 11 जुलै ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत गुरुचरित्र पारायण सेवा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १०८ पारायणे करण्याचा मानस स्वामी गजानंद महाराज यांनी व्यक्त केला आहे. २७ ची एक बॅच (गट) अशा चार बॅच मिळून १०८ पारायणे होतील. ज्यांना असा सप्ताह करण्याची इच्छा असेल त्यांनी नाव नोंदणी साठी स्वामीजी ना संपर्क साधावा.स्वामी गजानंद महाराज मोबाईल क्रमांक +91 90164 87318
येण्या जाण्यासाठी स्वतः करायचा आहे . नाव नोंदणी करताना 2,100/- देणगी मूल्य द्यायचे आहे. या मध्ये तेथे राहण्याची , चहा , भोजन इ. सर्व व्यवस्था आश्रमातर्फे करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. या उपक्रमात ज्यांना काही कारणास्तव येणे शक्य नाही ते आर्थिक मदत देऊन या पावन कार्यात सहभागी होऊ शकतात.
बॅच नं 1 – 11 जुलै ते 17 जुलै 2025
( 10 जुलैला आश्रमात पोहचणे आवश्यक आहे)
बॅच नं 2 – 18 जुलै ते 24 जुलै 2025 ( 24 जुलै – अमावस्या कन्यापूजन)
( 17 जुलैला आश्रमात पोहचणे आवश्यक आहे)
बॅच नं 3 – 25 जुलै ते 31 जुलै 2025
( 24 जुलै ला आश्रमात पोहचणे आवश्यक आहे)
बॅच नं 4 – 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 ( 8 ऑगस्ट – पोर्णिमा कन्यापूजन)
( 31 जुलै ला आश्रमात पोहचणे आवश्यक आहे)

