गुरुदत्त,गीता दत्त यांना रविवारी गीतांद्वारे आदरांजली


साताऱ्यात आम्ही आनंदयात्रीतर्फे गाण्यांचा कार्यक्रम

सातारा
येथील आम्ही आनंदीयात्री ग्रुप तर्फे हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त आणि गायिका गीता दत्त यांना गीतांद्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे. वक्त ने किया क्या हसी सितम या शीर्षकाखालील हा कार्यक्रम रविवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी सहा वाजता न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना ऍड स्नेहल कुलकर्णी यांची असून निर्मिती आणि दिग्दर्शन मुकुंद पांडे यांचे आहे. कार्यक्रमाच्या प्रायोजक सौ अनुराधा पांडे आहेत.

Advertisement

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार, संपादक मुकुंद फडके आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत यावेळी मुकुंद पांडे, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, लक्ष्मीकांत अघोर, प्रिया अघोर,आशुतोष देशपांडे, विजया चव्हाण, रेश्मा वाळिंबे, आशुतोष वाळिंबे आणि गायत्रीहे गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था संदीप कारंजकर सांभाळणार असून निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार आहेत. या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून सर्वांनी या गाण्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही आनंदीयात्रीतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!