साताऱ्यात गुरुवारी साहित्यिक आनंद मेळा


लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि आदिश जैन फाउंडेशनतर्फे आयोजन

सातारा
येथील लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था,आदिश जैन फाउंडेशन आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्यातर्फे गुरुवार दिनांक 25 जून रोजी लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी कोडोली येथे साहित्यिक आनंद मेळा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळा एकूण चार सत्रामध्ये चालणार असून सकाळी साडेअकरा ते साडेबारा या पहिल्या सत्रामध्ये कथाकथन होणार असून त्याचे गटप्रमुख डॉक्टर दिलीप गरुड आहेत. यावेळी आशा ठिपसे,नंदा देवडीकर, शुभदा उदगावकर, पल्लवी पाठक कथाकथन सादर करतील. दुसरे सत्र दुपारी बारा ते एक या कालावधीमध्ये असून यावेळी काव्यवाचन होणार आहे .या कार्यक्रमाचे गटप्रमुख सुरेश शेठ असणार असून अंजली डोळे, नीता तुपारे,सुजाता पवार, अंजली महाजन कविता सादर करतील. या दोन्ही सत्रांचे उद्घाटक जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके असणार आहेत, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक श्रीराम नानल असतील.

Advertisement

तिसरे सत्र दुपारी दोन ते दोन चाळीस या कालावधीमध्ये होणार असून त्यावेळी आपले कुटुंब या विषयावर चर्चा होणार आहे .या कार्यक्रमाचे गटप्रमुख म भा चव्हाण असणार असून त्यावेळी नीलिमा फाटक, मृणाल जैन, आपले विचार मांडतील .चौथे सत्र दुपारी 2 40 ते 3:30 या कालावधीत होणार असून त्याचा विषय स्वच्छता, वैयक्तिक व सामाजिक हा आहे.हा कार्यक्रम प्रश्नोत्तरे स्वरूपात असून डॉक्टर मृदुला खैरनार कुलकर्णी उत्तरे देतील. या कार्यक्रमाच्या गटप्रमुख राजश्री सोले असणार असून यावेळी पुष्पा कुलकर्णी वंदना घाणेकर, वंदना ललवाणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक कुपर उद्योग समूहाचे नितीन देशपांडे असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर संदीप श्रोत्री असतील. सर्वांनी या साहित्यिक मेळा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरिष चिटणीस, सचिव शिल्पा चिटणीस आणि लोकमंगल हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय यादव यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!