आंबेनळी घाटात अपघात, ८ ठार


पर्यटकांची स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली

Advertisement

रायगड:
रायगड जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत पर्यटक सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात हा अपघात घडला. वीकेंड संपवून परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घाटातील तीव्र वळणावर स्कॉर्पिओ गाडी थेट खोल दरीत कोसळली. रात्रीचा अंधार आणि घाटातील अतिशय दुर्गम भाग यामुळे प्रशासनाला अपघाताची माहिती मिळण्यास उशीर झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दरीची खोली जवळपास ७०० ते ८०० फूट असल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने बचावकार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. मृतदेह दरीतून वर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. सोमवार सकाळपर्यंत बचाव पथकाला दोन मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित ६ मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!