मायेची सावली पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
सातारा
येथील ज्येष्ठ कवी लेखक कै.आनंदा ननावरे यांच्या लेखणीतून निर्माण झालेली त्यांची अखेरची साहित्यकृती मायेची सावली या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी सहा वाजता अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, राजवाडा सातारा येथे होणार आहे .अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय आणि ननावरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध वक्ते ,विचारवंत, लेखक प्राचार्य यशवंत पाटणे असणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक डॉक्टर राजेंद्र माने,प्रा श्रीधर साळुंखे, सुप्रसिद्ध कवी व लेखक प्रदीप कांबळे, अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र झुटिंग, प्रकाशक दादासाहेब जगदाळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा शिरटावले करणार आहेत. सर्वांनी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन दीपक आनंद ननावरे, सौ शुभांगी ननावरे आणि अश्वमेध ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे

