निगर्वी खगोलशास्त्रज्ञ हरपला
जयंत नारळीकर यांना नगर वाचनालय येथे श्रध्दांजली
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा यांच्यामार्फत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व संशोधक साहित्यिक डॉक्टर जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी लेखक डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले जयंत नारळीकर यांनी विज्ञान सोपे करून मोठ्या पासून लहानापर्यंत पोहोचवले .ते अत्यंत साधे आणि निगर्वी होते .त्यांनी आयुकाची स्थापना केली . त्यांनी विज्ञान कथा लिहून रंजक पद्धतीने प्रबोधन त्यांच्या सर्व साहित्या मधून केले . शहाण्ण्यव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . सर्वात कमी वयात त्यांना पद्म पुरस्कार प्राप्त झाला होता .
डॉ संदीप श्रोत्री म्हणाले साताऱ्यात विविध कार्यक्रमाचे निमित्ताने त्यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या . विश्वाच्या निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली होती . अत्यंत साधेपणे ते सर्वांशी भेटायचे .
डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी काही वर्षापूर्वी जयंत नारळीकर यांनी नगरवाचनालयाला भेट दिली होती व वाचनालयाचे ग्रंथसंपदेविषयी चौकशी केली होती आणि समाधान व्यक्त केले होते,असे सांगितले
पद्माकर पाठकजी म्हणाले त्यांच्याशी प्रथम भेट झाली तेंव्हा मनावर दडपण होते पण त्यांच्या अत्यंत साध्या वागण्याबोलण्या मधून ते कधी नष्ट झाले हे समजले ही नाही .
कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात जयंत नारळीकर यांना नगरवाचनालयातर्फे श्रध्दांजली व्यक्त केली . सर्वांनी जयंत नारळीकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण केली . यावेळी जयंत नारळीकर यांची ग्रंथसंपदा वाचकासाठी प्रदर्शित करण्यात आली .
या वेळी संचालक डॉ श्याम बडवे , पत्रकार अनील वीर , गौतम भोसले , सुषमा भिडे , रुपा मुळे , वाचनालयाचे कर्मचारी , सभासद व वाचक उपस्थित होते .

