महाभारत ते भारत@२०२५ या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
पुणे पुस्तक महोत्सवात विशेष चर्चासत्र
पुणे
माधव जोशी यांनी लिहिलेल्या महाभारत ते भारत@२०२५ या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन होणार आहे राष्ट्रीय पुस्तक न्यासाद्वारे पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार, दि.२० डिसेंबर दुपारी २-३० वाजता पुस्तक महोत्सवातील लिटररी कॉर्नरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे
यावेळी या पुस्तकावर चर्चासत्र होणार असून त्यामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद मराठे , ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर जोगळेकर, लेखक माधव जोशी सहभागी होतील.
वेदकालापासून आजपर्यंतचा भारताचा इतिहास,संस्कृती,कला ,साहित्य,क्रीडा,अर्थव्यवस्था, नैसर्गिक संपत्ती,व्यवसाय सुलभता आणि बदलता समाज अशा ५५ पैलूंचे चित्रण या पाचशे पानी पुस्तकात वाचायला मिळेल. प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वकील श्री हरीश साळवे यांच्या प्रस्तावना हेही या पुस्तकाचे आकर्षण आहे.
या प्रकाशन सोहळ्यास व चर्चासत्रास पुस्तक प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन लेखक माधव जोशी यांनी केले आहे.

