रविवारी डॉक्टर अरुणा ढेरे यांचे साताऱ्यात व्याख्यान
गीत रामायणातील काव्यसौंदर्य या विषयावर करणार मांडणी
Advertisement
सातारा
येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयातर्फे ज्येष्ठ कवयित्री व साहित्यिक डॉक्टर अरुणा ढेरे यांचे गीतरामायणातील काव्यसौंदर्य या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान रविवार दिनांक 24 मे रोजी सायंकाळी सहा वाजता पाठक हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सीए विजयकुमार शिरसागर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अश्वमेध ग्रंथालय वाचनालयाचे संस्थापक रवींद्र भारती झूटिंग, अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र माने, उपाध्यक्ष डी एम मोहिते, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह शशीभूषण जाधव आणि प्राध्यापक श्रीधर साळुंखे, स्वप्नील शिंदे, गौतम भोसले, नंदाताई जाधव, सुनीता कदम यांनी केले आहे

