पीसीएम, पीसीबी सीईटी विद्यार्थ्यांसाठी बीबीए-बीसीए प्रवेशाची सुवर्णसंधी


यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विशेष प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष सुरू

Advertisement

सातारा :
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकत्याच जारी केलेल्या महत्त्वपूर्ण परिपत्रकानुसार, एमएचटी-सीईटी परीक्षेला पीसीएम तसेच पीसीबी गटातून बसलेल्या विद्यार्थ्यांना आता बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विज्ञान शाखेतील हजारो विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या झाल्या असून व्यवस्थापन आणि संगणक शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.
विद्यार्थ्यांना या नव्या प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच शासनाच्या नव्या नियमांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे विशेष “विशेष प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष ” सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवड, पात्रता, प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी, करिअर संधी आणि भविष्यातील रोजगाराच्या दिशा याबाबत मोफत मार्गदर्शन केले जात आहे.
आजच्या डिजिटल आणि व्यवस्थापनप्रधान युगात बीसीए आणि बीबीए हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत. बीसीए अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात. तर बीबीए अभ्यासक्रम व्यवस्थापन, मार्केटिंग, फायनान्स, उद्योजकता, बिझनेस अनालिटिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सक्षम बनवतो.विशेष म्हणजे, पूर्वी अनेक विद्यार्थ्यांना पीसीबी गट घेतल्यामुळे संगणक क्षेत्रात प्रवेश घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे आता जीवशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनाही आयटी आणि व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष मध्ये विद्यार्थ्यांना अनुभवी प्राध्यापकांकडून वैयक्तिक समुपदेशन दिले जात असून, पालकांच्या शंकांचेही निरसन केले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी विशेष करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना प्राध्यापक डॉक्टर दशरथ सगरे यांनी सांगितले, “महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना आता व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेंटरमधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रवेश प्रक्रिया सहाय्य आणि करिअर काऊन्सेलिंग दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता या संधीचा लाभ घ्यावा.”
दरम्यान, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, यशोदा टेक्निकल कॅम्पसचे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!