शिवाजी महाराजांचे आर्थिक व्यवस्थापन आदर्श


वसंत व्याख्यानमालेमध्ये प्राध्यापक अजित आपटे यांचे प्रतिपादन
सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धभूमीवर केलेल्या पराक्रमांचे नेहमीच कौतुक केले जाते पण व्यवस्थापन क्षेत्रामध्येही शिवाजी महाराजांचे कार्य अलौकिक आहे त्यातही आर्थिक व्यवस्थापनामध्ये शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन हा सर्वात आदर्श होता असे प्रतिपादन प्राध्यापक अजित आपटे यांनी केले
येथील ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये शिवाजी महाराज आणि मॉडर्न मॅनेजमेंट या विषयावर बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्थापनाची अनेक उत्कृष्ट उदाहरणे सांगितली
प्राध्यापक अजित आपटे म्हणाले, संपत्तीची निर्मिती ,संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप याबाबत शिवाजी महाराजांनी आदर्श दृष्टिकोन ठेवला होता त्याच दृष्टिकोनातून त्यांनी कर आकारणी केली होती महाराजांच्या स्वराज्यात नोकरी करणाऱ्या लोकांना दर महिन्याच्या प्रतिपदेला वेळेवर पगार देण्याचे त्यांचे धोरण होते एवढेच नाही तर विविध मार्गाने उत्पन्न झालेल्या संपत्तीचा विनियोग कसा करावा याचे नियम ठरवण्यात आले होते शिवाजी महाराजांनी बांधलेले विविध किल्ले आणि जलदुर्ग आहे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे
महाराजांनी आपल्या कार्यकाळात मनुष्यबळ विकास या क्षेत्रातही वेगळे व्यवस्थापन समोर ठेवले होते युद्धाच्या काळामध्ये जखमी झालेल्या किंवा मरण पावलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांसाठी अनुकंपा तत्त्वाचा उपयोग त्याच कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी केला होता आत्ता कार्यरत असलेली फॅमिली पेन्शनची योजना शिवाजी महाराजांनी त्या काळातच लागू केली होती एखादा सैनिक जर युद्धभूमीवर मरण पावला तर त्याच्या कुटुंबांना त्याच्या पगाराच्या निम्मे उत्पन्न तहहयात दिले जात असे,अशी माहितीही अजित आपटे यांनी दिली
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य हा केवळ एक दिवस चर्चेचा विषय नसून केजी टू पीजी सर्वच अभ्यासकांनी सातत्याने महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास करायला हवा असेही यावेळी प्राध्यापक अजित आपटे यांनी सांगितले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अनिता महाजन होत्या
व्यासपीठावर शाम शितळे आणि मोहन साठे उपस्थित होते
ज्ञानविकास मंडळाचे प्रसाद चाफेकर यांनी सर्वांचा सत्कार केला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!