“अलाइव्ह 2026” मध्ये ३२ संशोधन निबंध सादर


शाश्वत विकासासाठी संशोधनाधिष्टीत निर्णयप्रक्रिया आवश्यक – प्रा. डॉ पराग कालकर

सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये, सातारा येथे “अलाइव्ह 2026” या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. तसेच ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्ट्र्याट्याझिज’ या विषयावर आधारित या परिषदेत एकूण ३२ संशोधकांनी आपले संशोधन निबंध सादर केले.
परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. पराग कालकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या हस्ते पार पडले. सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. स्वेता मेहता उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत होते. याप्रसंगी एथॉस रिसर्च जर्नल आणि अलाइव्ह कॉनफरन्स शोधनिबंध प्रोसीडींगचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. पराग कालकर यांनी आपल्या बीज भाषणात शाश्वत विकासासाठी नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा वापर आणि संशोधनाधिष्ठित निर्णयप्रक्रिया यांचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ. स्वेता मेहता यांनी ग्रीन मॅनेजमेंट, डिजिटल इनोव्हेशन आणि उद्योग-शैक्षणिक समन्वय यावर भर दिला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी शाश्वत विकास म्हणजेच आर्थिक वाढ, नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व जतन आणि मानवाधिष्टित मुल्याधिष्टीत समाज. शहर वाढीचे व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, प्रदुषण नियंत्रण व देशाचा राहणीमान निर्देशांकात दिवसेंदिवस घसरण होत आहे. शाश्वत विकासातील या प्रमूख मुद्यावर सर्वांनी गांभिर्याने विचार करण्याचे आवश्यक असल्याचे नमूद केले.

Advertisement


यानंतर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली.
पहिल्या तांत्रिक सत्रात शिरीष खुटाळे यांनी “शाश्वत विकास धोरणांची उद्योग क्षेत्रातील अंमलबजावणी – केस स्टडी”या विषयावर मार्गदर्शन केले.
दुसरे तांत्रिक सत्र डॉ. एन. आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या सत्रात डॉ. पी. एम. कुलकर्णी (बेळगाव) यांनी “शाश्वत विकास धोरणांमधील संशोधन पद्धती”या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.दुपारनंतर विविध ट्रॅकमध्ये संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये ३२ सहभागी संशोधकांनी सहभाग नोंदविला.
परिषदेचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. गुरुनाथ जे. फगरे प्राचार्य किसनवीर महाविद्यालय वाई हे होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. बी. एस. सावंत संचालक के बी पी आय एम एस आर सातारा हे होते. यावेळी उत्कृष्ट संशोधन सादरीकरणांचे कौतुक करण्यात आले.
या परिषदेचे संयोजक डॉ. एस. एस. भोला व सहसंयोजक श्रीमती टी. एन. शेवते यांनी नियोजनबद्ध आयोजन केले. ही परिषद “शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन शिक्षक संघटना” यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!