सोमवारी ‘गाने जो दिल को छुले’ कार्यक्रम


दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्था आणि हार्मनी यांची प्रस्तुती
सातारा
दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या वतीने हार्मनी प्रस्तुत ‘गाने जो दिलं को छुले’ हा कार्यक्रम सोमवार २ जून २०२५ रोजी दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेपर्यंत होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विजय देशमुख,मुकुंद फडके,गुलाब सावंत आणि शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. या संगीतमय मैफीलीमध्ये रविंद्र खांडेकर,संगिता हेंद्रे आणि नितिन मुळे कराओके वर गाणी सादर करणार आहेत.
गेली सलग तीन वर्ष दिनांक 5 जून 2022 पासून हा ग्रुप एकूण ७० एपिसोडच्या माध्यमातून सातारकर रसिक श्रोत्यांना मंत्र मुग्ध करत आहे. नवी जुनी हिंदी मराठी अशी 1500 हुन अधिक श्रवणीय गाणी या ग्रुप च्या सर्व कलाकारांकडून ऐकायला मिळाली आहेत.या ग्रुप ने अनेक नवं नवीन कलाकारांना रसिक श्रोत्यामधून हेरून प्रोत्साहन देऊन कराओके घरोघरी ही संकल्पना प्रथम राबवली आणि ही एक संगीत चळवळ उभी राहिली. अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले
या ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिन निमित्त हा कार्यक्रमआयोजित केला आहे असे हार्मनीचे कुटुंब प्रमुख रवींद्र खांडेकर यांनी नमूद केलं. त्यांना साथ देत आहेत नितिन मूळे व संगीता हेंद्रे. सदर कार्यक्रमास आपण सर्व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून या संगीत मेहफिलीचा आनंद घ्यावा हे आव्हान दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे विनायक भोसले तसेच हार्मनी ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!