ज्ञानविकास मंडळाची वसंत व्याख्यानमाला आजपासून


पहिले पुष्प लेखक श्याम भुरके गुंफणार

Advertisement

सातारा
येथील ज्ञानविकास मंडळातर्फे वसंत व्याख्यान माळेचे ५३ वे सत्र सोमवार दिनांक 4 मे रोजी सुरू होणार असून पहिले पुष्प लेखक श्याम भुरके गुंफणार आहेत ते मराठी विनोद परंपरा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मुंबई येथील कै. श्रीराम अनंत सहस्त्रबुद्धे ,कै. सौ. राजश्री श्रीराम सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ ही वसंत व्याख्यानमाला दररोज सायंकाळी सहा वाजता पाठक हॉल नगर वाचनालय सातारा येथे होणार आहे,अशी माहिती ज्ञान विकास मंडळातर्फे प्रसाद चाफेकर यांनी दिली
पाच मे रोजी सुधीर थोरात यांचे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर व्याख्यान होणार आहे बुधवार दिनांक 6 मे रोजी डॉक्टर प्रसन्न दाभोळकर यांचे मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर, गुरुवार दिनांक सात मे रोजी प्रसाद मोरे यांचे आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक आजची गरज या विषयावर, शुक्रवार दिनांक ८ मे रोजी मधुकर धर्मापुरीकर यांचे व्यंगचित्रांची भाषा या विषयावर, शनिवार दिनांक नऊ मे रोजी स्वाती राजे यांचे भाषेची चळवळ उभारताना या विषयावर, रविवार दिनांक 10 मे रोजी स्मिता आपटे यांचे स्त्री विविध स्त्रीचा व्यक्त होणे या विषयावर, सोमवार दिनांक 11 मे रोजी विनायक अभ्यंकर यांचे युद्धस्य कथा रम्य या विषयावर, मंगळवार दिनांक 12 मे रोजी गायक फारुख शेख यांचा मोहम्मद रफी स्पेशल हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. बुधवार दिनांक 13 मे रोजी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांचे कुठे नियम ठेवला महाराष्ट्र माझा या विषयावर व्याख्यान होईल. गुरुवार दिनांक 14 मे रोजी साताऱ्यातील स्थानिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि राजकीय विश्लेषक नारीशक्ती वंदन विधेयक कितपत उचित या विषयावर चर्चा करतील. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी प्रसाद चाफेकर यांचे महाराष्ट्राचा कोहिनूर लोकमान्य टिळक या विषयावर व्याख्यान होईल. शनिवार दिनांक 16 मे रोजी मयूर भावे यांचे समर्थांचा राष्ट्रजागर या विषयावर व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होईल
सातारकरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!