संगम माहुली येथे 19 एप्रिलला परशुराम जन्मोत्सव
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सातारा
येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली सातारा येथे रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरा केला जाणार आहे संगम माहुली येथील परशुराम देवस्थान येथे हा सोहळा होणार आहे या सोहळ्यामध्ये दुपारी साडेचार वाजता ह.भ.प. सौ निशा विनय फाटक यांचे किर्तन होणार आहे सायंकाळी सव्वा सहा वाजता अग्निहोत्र व श्री जन्मोत्सव सोहळा होणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता दर्शन व प्रसाद सोहळा होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले आहे

