पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
सातारा जिल्ह्यातील पाटखळ गावातील घटना
सातारा
साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पाटखळ गावात एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला वाचवलं असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात जुन्या वादातून संशयित शिवजीत माने या युवकाने त्याच्या इतर साथीदारांना घेऊन अनिल शिंदे या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये संबंधित व्यक्ती पस्तीस टक्केहुन अधिक भाजून जखमी झाली आहे. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ जखमी व्यक्तीच्या अंगावरील आग विझवून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणातील संशयित शिवजीत माने यांच्यासह 3 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे
