विद्रोही संमेलन पदाधिकाऱ्यांचे महात्मा फुले यांना अभिवादन


सातारा
महात्मा जोतिराव फुले यांचे २०० वे जयंती वर्ष सुरू झाले आहे आज महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त त्यांची कुलभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे जाऊन १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केले. आणि महात्मा फुले यांचा क्रांतिकारक वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
कटगुण येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार डॉ. फडतरे महाराज व संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके , सरचिटणीस एडवोकेट राजेंद्र गलांडे , सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद , हनुमंत सावंत , शिवाजी भोसले , आसिफ शेख व प्रकाश तांबे यांनी अर्पण केला. संमेलनाच्या आवाहन पत्रिकेचेही यावेळी अनावरण करण्यात आले.
येत्या दि ९ व १० मे रोजी सातारा येथे पंधरा वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज कटगुण येथे जाऊन तेथील ग्रामस्थांना व नागरिकांना संमेलनाच्या संदर्भात संयोजन समितीचे अध्यक्ष सुहास महाराज फडतरे यांनी माहिती दिली व संमेलनाला येण्याचे आवाहन केले. यावेळी संमेलन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेचे ही वाटप उपस्थिताना करण्यात आले.
महात्मा फुले यांच्या दोनशे व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने वर्षभर समविचारी कार्यकर्ते व संघटनांना बरोबर घेऊन कार्यक्रम करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!