दादांच्या स्वप्नातील पक्षपुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे – सुनिल तटकरे


मुंबई
अजितदादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
दादांनी ज्या कठोर परिश्रमातून एनडीएसोबत जाण्याची क्षमता प्रखरतेने दाखवली होती…आत्मविश्वासाने दाखवली होती. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा ज्या आत्मविश्वासाने दादांनी पक्षाचे संघटन आम्हा सर्व सहकार्‍यांना विश्वासात घेऊन उभे केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा ७२ टक्के स्ट्राईक रेट राहिला होता. दादांच्या जाण्याने आमच्यावर जो प्रसंग आला आहे त्यात आम्ही हळवे झालो आहोत आमच्या मनातील संवेदना जागृत आहेत. दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. अनेक विषयांवर आम्ही बोललो आहोत त्यामुळेच दादांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली पुढे नेणे आम्हा सर्वांचे काम आहे. ते आम्ही नेटाने करु असे सुनिल तटकरे यांनी विरोधकांना खडसावून सांगितले आहे.
आमचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पक्षाची घटना आणि त्यातील कलमे याबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती कागदपत्रांसह आपल्यासमोर ठेवली आहे त्यामुळे मला त्या विषयावर अधिक काही बोलायचे नाही. पण योग्यवेळी योग्य ते बोलेन असेही सुनिल तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Advertisement

सुनेत्रावहिनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ आपणाला चिंता करण्याची गरज नाही असे माध्यम प्रतिनिधींना सुनिल तटकरे यांनी सुनावले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!