हार्मनी प्रस्तुत गाने जो दिल को छुले
गाजलेल्या हिंदी गाण्यांची मंगळवारी मैफल
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा आयोजित हार्मनी प्रस्तुत गाने जो दिल को छुले “गाजलेल्या हिंदी गाण्यांची सुरेल मैफिल” कार्यक्रम दीपलक्ष्मी संस्कृतिक हॉल 759 अ,शनिवार पेठ सातारा येथे मंगळवार दि.27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीकांत तारे, श्रीराम नानल, डॉ. संदीप श्रोत्री, अनिल वाळिंबे, शिरीष चिटणीस, तसेच व्यवस्थापक
विनायक भोसले,मान्यवर उपस्थित उपस्थित राहणार आहेत.
या सदाबहार कार्यक्रमात रवींद्र खांडेकर, अपर्णा बनसोडे,श्वेता जाधव सहभागी कलाकार गायन करणार असून कार्यक्रमाचे निवेदन सपना डफळे करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अगोदर हार्मनी प्रस्तुत “रिमझिम के तराने लेके आई बरसात ” “घन निळा बरसला ” “एक शाम रफी के नाम” या सारख्या सदाबहार मैफिलीने समस्त सातारकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.तरी दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित व हार्मनी प्रस्तुत
” गाजलेल्या हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफिलीस समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक
विनायक भोसले तसेच हार्मनी ग्रुपचे प्रमुख रवींद्र खांडेकर यांनी केले आहे.
