अनिल वाळिंबे यांची शनिवारी शोकसभा


साताऱ्यातील विविध संस्थांतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
सातारा शहरातील अनेक संगीत आणि कला संस्थांचे ज्येष्ठ मार्गदर्शक संगीततज्ञ अनिल वाळिंबे यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांची श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता दीपलक्ष्मी पतसंस्था सभागृह
येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आम्ही पुस्तकप्रेमी समूह, सातारा,कला सरगम, सातारा ,भारत विकास परिषद, सातारा,श्री छ प्रतापसिंह (थोरले) नगर वाचनालय, सातारा,
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा यांच्यातर्फे या शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून सर्व संगीतप्रेमींनी उपस्थि राहावे असे आवाहन
नगर वाचनालयाचे अध्यक्ष अमित कुळकर्णी,कला सरगमचे सुधाकर जोशी,भारत विकास परिषेदेच्या सीमा दाते, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन शिरीष चिटणीस आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे डॉ संदीप श्रोत्री यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!