आनंदाने जगणे म्हणजेच खरा परमार्थ


ज्ञानयज्ञ कार्यक्रमात डॉक्टर सुभाष आगाशे यांचे प्रतिपादन
सातारा
प्रत्येक माणसाला सुख समाधान शांती आणि आनंद हवा असतो म्हणूनच आनंदाने जगणे म्हणजेच खरा परमार्थ आहे असे प्रतिपादन डॉक्टर सुभाष आगाशे यांनी केले
बाळासाहेब शिवदे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये बोलत होते
सुभाष आगाशे म्हणाले, सुख समाधान शांती आणि आनंद यांचा क्रम लक्षात घ्यायला हवा. सुख आणि समाधान हे शरीरासाठी असते. तर शांती आणि हे आनंद हे आत्म्यासाठी असते हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक व्यक्तीने आपले अंतिम ध्येय काय आहे हे समजून घ्यायला हवे. जसे मृत्यू हे देहाचे अंतिम ध्येय असू शकते पण ईश्वर प्राप्ती हे आत्म्याचे म्हणजेच जीवाचे अंतिम ध्येय असते
आधुनिक काळामध्ये तणावामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगून डॉक्टर सुभाष आगाशे म्हणाले, आपण जे कर्म करतो त्यांच्या परिणामांचा विचार केल्यामुळे तणाव निर्माण होतो अहंकार आणि असक्ती हे मानवी दुःखाचे खरे कारण आहे या अहंकाराचा आणि आसक्तीचा नाश झाला तर शांतियुक्त आणि आनंदयुक्त जीवन जगणे शक्य होणार आहे
भारतीय संस्कृतीतील अनेक संतांनी समुपदेशनाच्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन केले आहे प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये दोन मी असतात त्यापैकी जो एक खोटा मी असतो त्यालाच अहंकार असे म्हटले जाते हा अहंकारच विविध कारणाने तणावयुक्त परिस्थिती निर्माण करतो संतांच्या समुपदेशनाच्या माध्यमातून हा अहंकार कमी होऊ शकतो
रवींद्र शिवदे यांच्या पिरवाडी येथे श्रद्धा बंगल्यामध्ये ही प्रवचन माला सुरू असून शुक्रवार दिनांक 14 जून पर्यंत ती चालू राहणार आहे संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या प्रवचन मालेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!