साहित्य संमेलन फलश्रुतीवर सोमवारी परिसंवाद


दीपलक्ष्मी सभागृहातील कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार

सातारा

Advertisement

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि संस्कार भारती सातारा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची फलश्रुती या विषयावर परिसंवाद आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताचे प्रचार प्रमुख व विश्वस्त रुपेश कुंभार उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस असणार आहेत. यावेळी सातारा येथील साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलेले संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि अटकेपार या स्मरणिकेचे व्यवस्थापकीय संपादक व ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी साहित्य संमेलनाची फलश्रुती या विषयावरील परिसंवादामध्ये प्राध्यापक शेखर कुलकर्णी, उमा आठले,सविता कारंजकर, पद्माकर पाठकजी आणि वसंत शिंदे भाग घेणार आहेत.
सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले, पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री आणि संस्कार भारती सातारा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!