साताऱ्यात गुरुवारी हिंदी गीतांची बहारदार मैफिल


दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर ग्रुप सातारा यांच्यातर्फे प्यार के इस खेल में या संकल्पनेवर आधारित हिंदी गीतांची बहारदार मैफिल आयोजित करण्यात आली आहे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ,विजय साबळे,डॉ लियाकत शेख, डॉक्टर सुनील पटवर्धन,अनिल वाळिंबे, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
यावेळी सुहाना सफर ग्रुपचे कलाकार शिरीष खुटाळे, मिलिंद हर्षे, अल्ताफ मुल्ला गणेश शिंदे,उमेश खोले, अभिनय बर्गे, उद्धव इंगवले, अरुणा नाझरे , कविता शिवकुमार,शुभांगी मुरुडकर कलाचंद आणि इंद्रायणी कुलकर्णी गाणी सादर करणार आहेत
या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन विजय साबळे यांचे असून निवेदन दिपाली गीते करणार आहेत ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे अमी आणि अक्षता शेवडे पाहणार आहेत सातारकर रसिकांनी या गाण्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!