साताऱ्यात संक्रांत मेळाव्याला प्रतिसाद


अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाड़ी यांच्यातर्फे आयोजन
सातारा
स्वयंसिद्धा व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाड़ी यांच्यातर्फे पोलीस करमणूक केंद्र सातारा येथे सक्रांत मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सोनलताई भोसकर व सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश काणे , अखिल ब्राह्मण महासंघ अध्यक्ष धनंजय कुलकर्णी हे उपास्थित होते. संध्याकाळी महिलांसाठी हंळदिकुंकु व लहान मुलांसाठी बोरन्हाणाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचे ४५ स्टॉल्स या मेळाव्यात होते आणि सर्व स्टॉल महिलांचे होते हे विशेष. यावेळी मिस, मिसेस आणि लहान मुलांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते यावेळी .संजय कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला संक्रांत मेळावा यशस्वी होण्यासाठी सौ.दिपाली कुलकर्णी , सौ.मंजिरी काणे,सौ.वृषाली कुलकर्णी,सौ. भाग्यश्री लेले,सौ. लीना ढेकणे यांनी परिश्रम घेतले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!