पुणे अपघात प्रकरणी 2 पोलीस निलंबित


तपासात दिरंगाई केल्याचा ठपका

पुणे

Advertisement

पुण्यात 18 मे 2024 रोजी पहाटे जे घडलं, त्याची संतप्त प्रतिक्रिया केवळ पुण्यात नाही, तर देशभर उमटली. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
तपासात दिरंगाई केल्याबद्दल आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा आरोप लावत या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
अपघातप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (24 मे) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.घटना घडल्यानंतर सुरुवातीला अल्पवयीन आरोपी गाडी चालवत नव्हता तर दुसरं कोणीतरी गाडी चालवत होता, हे दाखवण्याचा प्रयत्न झाला होता, असं अमितेश कुमार म्हणाले. पण पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता असंही त्यांनी सांगितलं. अशाप्रकारे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कारवाई केला जात आहे.ड्रायव्हरनं सुरुवातीला पोलीस ठाण्यात मुलगा नव्हते तर तो गाडी चालवत होता असं सांगितलं होतं. पण ड्रायव्हर कुणाच्या दबावाखाली बोलत होता, हे तपासलं जात असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!