जीवन सुंदर आहे,समाधानाने जगा: दिलीप चरेगावकर


उमा आठल्ये ह्यांच्या पठणवर्गाचा गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम
सातारा
जीवन सुंदर आहे,समाधानाने जगा असे आवाहन संस्कारभारती सातारा जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले साताऱ्यातील सुप्रसिद्ध संस्कृत व मराठी साहित्य अभ्यासक उमा आठल्ये ह्यांच्या पठणवर्गाचे ,”गुरुपौर्णिमेनिमित्त” गुरुपूजनाचा सुपनेकर हॉलमध्ये खास कार्यक्रम आयोजीत केला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते उमा आठल्ये गेली 30 वर्षे महिलांना गीता, रुद्र, श्रीसूक्त, सप्तशती विविध विविध स्तोत्रं तसेच भारतीय संस्कृतीचे शिक्षण देत आहेत,सांस्कृतिक कार्या बरोबरच मुलांसाठी संस्कारवर्ग अशासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात.
दिलीप चरेगावकर ह्यानी महिलांच्या सांसारिक जबाबदाऱ्या त्यांना रोजच्या जीवनात येणारे अनुभव व आधुनिक राहणीमान व उपलब्ध सोशलमीडिया,मोबाईल ह्या साधनांचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचे विस्तृत विवेचन केले. आयुष्यात समाधान,सुख व जीवनाचा आनंद कसा मिळवावा ह्या विषयी आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुरवातीस स्वामी रामकृष्ण परमहंस ह्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे सुरवातीस सौ सुजाता कानेटकर ह्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली,तर श्री उमा आठल्ये ह्यांनी आभार मानले, कार्यक्रमातील भाषणास उपस्थित महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला!
शेवटी अल्पोपहार घेऊन कार्यक्रम संपन्न झा
!कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ साधना कुलकर्णी, सौ सुजाता कानेटकर,सौ माधुरी अत्रे,सौ विजया कुमठेकर,सौ काटवे ह्यांनी परिश्रम घेतले!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!