मंगळवारी साताऱ्यात गाणी मनातली हा कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहरकारी पतसंस्था आणि मायबिट्स कराओके स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे गाणी मनातली हा हिंदी मराठी सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन व संकल्पना डॉक्टर लियाकत शेख यांचे असून डॉक्टर लियाकत शेख यांच्याशिवाय डॉक्टर वाय पी चव्हाण, संदीप इनामदार ,मनोज सावंत ,गणेश शिंदे, कल्याणी इनामदार ,कलाचंद पाटील, सारिका हेंद्रे, संगीता सपकाळ, चित्रा भिसे, वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित हे गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था अक्षता व सचिन शेवडे सांभाळणार असून निवेदन चित्रा भिसे करणार आहेत .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत देवधर ,काका पाटील ,सीमा पाटील, शिरीष चिटणीस ,मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!