‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन!


अभिनेता रितेश देशमुख करणार कार्यक्रम होस्ट

मुंबई
टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने आणि चवीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’.नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, यामध्ये महेश मांजरेकर दिसणार नाहीत.अभिनेता रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करणार आहे

Advertisement

‘बिग बॉस मराठी’च्या ४ सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हे चारही सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण, ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये मात्र महेश मांजरेकर दिसणार नाहीत. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या सीझनमध्ये नवा होस्ट दिसणार आहे. कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरुन नव्या सीझनची घोषणा करण्यात आली असून नव्या होस्टच्या चेहऱ्यावरुनही पडदा हटवण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!