“शाम-ए-गझल”कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सातारा
“शाम-ए-गझल” हा गझल संगीताचा कार्यक्रम दीपलक्ष्मी प्रतिष्ठान आणि सुरीली शाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सादरीकरण श्री. कैलास मोहिते यांनी केले, तर गायक म्हणून श्री. कैलास मोहिते व सौ. ममता नरहरी या दोघांनी गायन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश ढवळीकर ,शिरीष चिटणीस, रमेश वेलणकर, उर्मिला जांगिड,श्वेता जाधव उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाचे शैलेश ढवळीकर म्हणाले,गझलची मैफिल म्हणजे शब्द,सूर आणि भावनांचा सुंदर मिलाफ असतो.साताऱ्यात दीपलक्ष्मी पत संस्थेच्या सभागृहात होत असलेल्या कराओके,गझल कार्यक्रमामुळे रसिक सातारकरांना आनंद मिळत आहे.
शिरीष चिटणीस म्हणाले,परंपरेने उर्दू-फारसीत फुललेली गझल आज हिंदीतही तेवढ्याच ताकदीने आणि नजाकतीने उमलत आहे.हिंदी गझलकारानी आपल्या मातीतला सुगंध,बोलीची गोड़ी आणि काळाचे भान यात मिसळून गझलला आपल्यासारखे रूप दिले आहे.
रमेश वेलणकर यांनी शेरोशायरी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.
श्री. कैलास मोहिते आणि सौ. ममता नरहरी यांनी गुलजार, कैफी आझमी, हसन कमाल, आनंद बक्षी, इंदीवर अशा दिग्गज शायरांच्या तसेच जगजीत सिंग, चित्रा सिंग, लता मंगेशकर यांसारख्या नामवंत गझल गायकांनी गायलेल्या अनेक सुंदर गझलांची निवडक मैफिल सादर केली.
या कार्यक्रमाचे संचालन सौ. ममता नरहरी यांनी तर ध्वनी व्यवस्था कैलास मोहिते यांनी उत्तमरीत्या सांभाळली.
प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी वाहवा, टाळ्या व दाद देऊन कलाकारांचा उत्साह वाढवला व त्यांचे कौतुक केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!