लोकमंगल हायस्कूलमध्ये शुक्रवारी बालकुमार साहित्य संमेलन


सातारा,

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा सातारा, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा आणि लोकमंगल हायस्कूल, मोळाचा ओढा, गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन 2025 शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत लोकमंगल हायस्कूल, सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकमंगल हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी कु. तेजस्विनी चव्हाण (बी. फार्म) यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विद्यार्थी व सर्पमित्र मयूर अडागळे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा अध्यक्ष शिरीष चिटणीस, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा अध्यक्ष शिल्पा चिटणीस तसेच माजी सैनिक रामचंद्र जाधव उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

कार्यक्रमाचे विनीत म्हणून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा कोषाध्यक्ष शशिकांत जमदाडे, सहकार्यवाह नंदा पवार, लोकमंगल हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत व वरिष्ठ शिक्षक शांताराम पवार कार्यरत आहेत.

सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत उद्घाटन, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन, स्वागत गीत, प्रास्ताविक व मान्यवरांची मनोगते होणार आहेत. दुपारी बारा ते तीन या वेळेत कथाकथन, काव्यगायन, ‘मला आवडलेले पुस्तक’ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या साहित्य संमेलनास बालकुमार, विद्यार्थी, शिक्षक, व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!