साताऱ्यात बुधवारी बालकुमार १८ वे साहित्य संमेलन
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा यांचे आयोजन
सातारा .
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य परिषद पुणे शाखा सातारा आणि लोकमंगल हायस्कूल एम .आय .डी .सी . सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत १८वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन २०२५ आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली आहे . यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माजी विद्यार्थी व उद्योजक महेश सोनवणे हे असणार आहेत या साहित्य संमेलनासाठी डॉ .दिलीप गरुड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच शिल्पा चिटणीस अध्यक्षा, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे . संमेलनात बालकुमार साहित्याचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन, परिसंवाद, कविता-कथाकथन, स्पर्धा, विविध गुणदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संमेलनात बालवाचक, शिक्षक व साहित्यप्रेमींना मेजवानी मिळणार आहे. बालकुमारांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, हा या संमेलनाचा मुख्य हेतू असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या बाबर व ज्येष्ठ शिक्षक विजय यादव यांनी सांगितले.

