गुरुवारी साताऱ्यात बालसुब्रम्हण्यम यांच्या गाण्याचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुरीली शामतर्फे आयोजन
Advertisement
सातारा येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरीली श्याम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे ज्येष्ठ गायक एस पी
बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कैलास मोहिते आणि ममता नरहरी हे गायक कलाकार सुब्रमण्यम यांची विविध गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार निकम,मुकुंद फडके,शिरिष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

